सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद, ५ जखमी

श्रीनगर, दि. 5 – जम्मू- काश्मीरच्या पंपोर जवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात दोन जवान शहीद झाले असून पाच जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पंपोरच्या कांधीजल पुलावर सीआरपीएफच्या ११० बटालियनचे जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिस रोड ओपनिंग ड्यूटीसाठी (आरओपी) तैनात करण्यात आले होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन जवान शहीद झाले असून पाच जवान जखमी झाले आहेत. या परिसराची घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: