कोरोना – देशात रुग्णांचा आकडा 65 लाखांच्या पार; तर 1 लाखांहून अधिक बळी

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. आता भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 65 लाखांच्या पुढे गेली आहे, तर कोरोनाबळींच्या आकड्याने १ लाखांचा टप्पा पार केला आहे . मागील 24 तासांत देशात 75 हजार 829 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 940 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 65 लाख 49 हजार 374 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 1 हजार 782 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 55 लाख 09 हजार 967 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 9 लाख 37 हजार 625 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, सध्या देशात कोरोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 7 कोटी ८९ लाख ९२ हजार ५३४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर शनिवारी ११ लाख ४२ हजार १३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: