व्याजवरील व्याज माफ होणार – केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती; पुण्यातील याचिकाकर्त्यांच्या प्रयत्नांना यश 

पुणे  :बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने शनिवारी  दिली. हे व्याज बँकांनी आकारू नये ,यासाठी पुण्यातील विजयसिंह  डुबल , भाऊसाहेब जंजिरे यांनी  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
या प्रयत्नांना अखेर यश आले आहे .सोमवारी या बाबत अंतिम सुनावणी होणार आहे ,त्याआधीच केंद्राने आपला इरादा जाहीर केला. विजयसिंह डुबल,भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या वतीने ऍड . असीम सरोदे यांनी काम पाहिले. 
 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या कर्जदारांना मोठा दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.लॉकडाउनच्या काळामध्ये मोरॅटोरियमचा (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा करणाऱ्या अधिकार) वापर करणाऱ्यांना भरावे लागणारे व्याजावरील व्याज माफ होऊ शकते. दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना दिलासा देण्याचा सरकारचा विचार आहे. नियमितप्रमाणे कर्ज भरणारयाना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. खुद्द केंद्राकडूनच सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे. या व्याजमाफीमुळे येणारा सगळा आर्थिक ताण सहन करण्याची तयारी अर्थमंत्रालयाने दर्शविली आहे.

केंद्र सरकारच्या या व्याजमाफीचा मोठा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक आणि घर खरेदीसाठी कर्ज घेणारे, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन खरेदी आणि क्रेडिट कार्डचे हप्ते थकलेल्यांना होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: