अमित भंडारी प्लॅनेट मराठीचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट

काही महिन्यांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची घोषणा करण्यात आली आणि सर्वत्र चर्चेला उधाण आलं. त्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या टीममधील एक-एक नाव लोकांसमोर येऊ लागली. आता असेच एक नाव ‘प्लॅनेट मराठी’ सोबत जोडले जात आहे, ते म्हणजे अमित भंडारी. गेल्या अनेक वर्षांपासून नामांकित वृत्तपत्र, आघाडीची वृत्तवाहिनी आणि त्यानंतर काही काळ मनोरंजन वाहिनीवर काम केल्यानंतर अमित भंडारी आता ‘प्लॅनेट मराठी’च्या निमित्तानं एका त्यांच्या नव्या इनिंगची सुरुवात करत आहेत.

मनोरंजन विश्वात नवनवीन प्रयोग करून दरवेळी चर्चेत राहणारं म्हणजे ‘प्लॅनेट मराठी’. प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी २०१७ मध्ये या कंपनीची स्थापना केली. हळूहळू सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत, ही कंपनी चर्चेचा विषय बनू लागली. आता अमित भंडारी सारखं मोठ्ठं नाव या कंपनीशी जोडलं जातंय म्हटल्यावर कलाकृतींचा दर्जा उंचावणार, हे नक्की! अमित यांच्या या निर्णयाबद्दल त्यांना विचारलं असता, प्लॅनेट मराठी-फिल्म प्रॉडक्शन, प्लॅनेट टॅलेंट आणि लवकरच आपल्या भेटीला येणाऱ्या प्लॅनेट मराठी ओटीटी अशा तीनही विभागांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या प्रेक्षकांची भूक ही केवळ चित्रपट किंवा मालिकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे अभिरूची समृद्ध करणाऱ्या आणि बदलत्या काळाचं प्रतिबिंब टिपणाऱ्या कलाकृतीत दिसण्याची नांदी ही मराठीत मनोरंजन विश्वात ‘प्लॅनेट मराठी’ सुरू करेल ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे दर्जा कायम राखत निखळ व कसदार आणि रिफ्रेशिंग कॉण्टेण्ट प्लॅनेट मराठीवर आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं ते सांगतात. ‘म मानाचा, म मराठीचा’ या ब्रीदवाक्याला न्याय देत कलात्मकता आणि अर्थकारण यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याच ते सांगतात.

येणारा काळ हा मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत निर्णायक आहे. “जागतिक स्तरावरील कलाकृती पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आपलंसं वाटेल आणि मराठी मातीचागंध असेल असा वेगळेपणा राखणाऱ्या कलाकृती निर्माण करणं, या आव्हानाचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करेन”, असं अमित भंडारी सांगतात. ते जागतिक स्तरावर मराठीचा झेंडा फडकावणाऱ्या ध्येयवेड्या अक्षय बर्दापूरकर यांच्या या चळवळीत आपलाही सहभाग असावा, या हेतूनेच अमित यांनी ‘प्लॅनेट मराठी’ची वाट निवडली आहे. मराठी मनोरंजनाच्या बदलत्या अर्थकारणाचा वेध घेत ओटीटीसोबत टॅलेण्ट मॅनेजमेण्ट आणि चित्रपटनिर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘मुंबई टाइम्स’, ‘युवा सकाळ’, स्टार माझा (आताचे एबीपी माझा) आणि सोनी मराठी यांच्या लॉंचिंगच्या काळात नवीन आव्हानं अमित भंडारी यांनी यशस्वीपणे पेलली. दीड दशकांपेक्षा मराठी/हिंदी मनोरंजन क्षेत्राचा असलेला अमित भंडारी यांचा अभिरूची संपन्न करणारा अनुभव आणि ‘प्लॅनेट मराठी’चा ब्रॅण्ड हे समीकरण नव्या प्रयत्नांना चार चांद लावेल, असे प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केले.

अमित भंडारी प्लॅनेट मराठीचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट म्हणून पदभार स्विकारला आहे. चित्रपट निर्मिती, टॅलेंट मॅनेजमेंट आणि ओटीटी यांचं अर्थकारण आणि कलाकृती निर्मितीचं काम प्रामुख्याने ते पाहतील. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मनोरंजन घेऊन येताना दर्जा आणि मराठी मनाला साद घालण्याचा मानस असल्याच त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: