हाथरस – सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या – रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय आणि राज्य मंत्री रामदास आठवले यांनी हाथरस मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. रामदास आठवले हे येत्या शुक्रवारी हाथरसचा दौरा करणार असून पीडित मुलीच्या परिवाराची भेट घेणार आहेत. त्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोंबरला लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि राज्य मंत्री रामदास आठवले येत्या 2 ऑक्टोंबर पासून दोन दिवशीय दौऱ्यासाठी उत्तर प्रदेशात जाणार आहेत. 2 ऑक्टोंबरला प्रथम आठवले हाथरस मधील मृत पीडितेच्या परिवाराची भेट घेत त्यांना आर्थिक मदत करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोंबरला योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. त्यावेळी आठवले आदित्यनाथ यांना पीडितेच्या परिवाराला न्याय देण्यासह आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित कुटुंबातील मुलीसोबत घडलेली दुर्घटना अत्यंत निंदनीय आहे. देभरातील पक्षाचे कार्यकर्ते यामुळे अत्यंत संतप्त झाले आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी आरपीआयकडून या घटनेच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे. रामदास आठवले यांच्या पक्षाने हाथरस मधील दलित मुलीसोबत जे कृत्य करण्यात आले त्याच्या विरोधात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असे म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: