अनुराग कश्यपची पोलिसांनी केली चौकशी

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला. तिच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांकडून अनुरागची चौकशी झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुरागला पोलिसांनी मुंबईबाहेर न जाण्याचे आवाहन केलंय. हा तपास सुरु असताना पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आलं. 

अनुरागने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी पायलला फक्त प्रोफेशनली ओळखतो. बराच काळ पायलशी माझं बोलण झाल नाही किंवा भेटही झाली नाही. 

माझ्या वर्सोवातील घरात तिच्याशी भेट झाली नाही किंवा मी तिचे लैंगिक शोषण देखील केले नाही. पायलने माझ्याविरोधात केलेले आरोप ऐकून मीच आश्चर्यचकीत झालो. हे सर्व आरोप खोटे, निष्फळ आहेत. यात अजिबात सत्यता नाही. माझ्याविरोधात हे कटकारस्थान आहे. मी याप्रकरणात पूर्णपणे निर्दोष असल्याचे अनुरागने सांगितले. 

हे आरोप खरे वाटल्यास मुंबई पोलीस अनुरागविरोधात कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करु शकतात. कलम ३७६ (I) म्हणजेच बलात्कारचा आरोप, ३५४ म्हणजे महीलांची मर्यादा भंग करण्यासाठी हल्ला करणे, ३४१ म्हणजे कोणत्याही महिलेला चुकीच्या पद्धतीने थांबवण आणि ३४२ म्हणजे कोणाला बंदी बनवण हे ३७६ नुसार अजामिनपत्र कलम आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: