लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी- २ तर्फे ४ ऑकटोबर रोजी रांगोळी आणि भित्तीपत्रक स्पर्धा

रक्तदान संकल्पनेच्या प्रसारासाठी लायन्स चा पुढाकार
पुणे : राष्ट्रीय स्वयंप्रेरित रक्तदान दिनानिमित्त लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी- २ मधील ब्रह्मपुत्र रीजन तर्फे रविवार , ४ ऑकटोबर रोजी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांतपाल अभय शास्त्री,रिजन चेअरपर्सन पुनीत कोठारी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सातारा रस्त्यावरील स्वयंवर मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा   सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान होणार असून ‘ रक्तदान हेच जीवनदान ‘ या संकल्पनेवर  रांगोळी आणि भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रांगोळी आणि रंग’,’रांगोळी आणि खडे ,धान्य ,पाकळ्या ‘ अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे .विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विना शुल्क प्रवेश आहे. विभागीय अध्यक्ष प्रीती दीक्षित, विभागीय अध्यक्ष एडव्होकेट प्रीती परांजपे, ऐश्वर्या घोलप संयोजन करीत आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: