प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांची पुणे शहर भाजपा युवती प्रमुखपदी निवड

राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्या शुभेच्छा

– भाजपच्या पहिल्या युवतीअध्यक्ष पदाचा मान त्यांना मिळाला आहे

पुणे, दि. 1 – शैक्षणिक , सामाजिक , क्षेत्रात काम करणा-या उच्चशिक्षित तसेच आय. आय. एम. अहमदाबाद येथून व्यवस्थापनशास्राचे शिक्षण घेवून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डाॅक्टरेट असलेल्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांची पुणे शहर भाजपा युवती प्रमुख पदी निवड करण्यात आली.

पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या निवडीबाबतचे नियुक्ती पत्र दिले यावेळी नगरसेवक व सरचिटणीस राजेश येनपुरे, नगरसेवक व सरचिटणीस दीपक पोटे , सरचिटणीस दीपक नागपुरे , सरचिटणीस गणेश घोष व इतर शहर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे अवनी यासंस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.
आजच्या कोरोनाच्या काळातही त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संघटना , संस्था यांना मदत केली आहे. युवतींचे असणारे अनेक प्रश्न त्यांना सोडविण्याचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे समाजातील हजारो युवतींना त्यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यामातून त्यांना स्वत :च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. त्याच प्रमाणे अनेक विद्यार्थी , युवतींचे शिक्षण त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. शहरातील अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची असणारी अडचणी त्यांनी सोडविल्या आहेत.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी अवनी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांना कोरोना काळात दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांना घरी जाण्यासाठी देखील आवश्यक अशी सर्व शासकीय परवानगी घेऊन केलेली व्यवस्था असेल.
शैक्षणिक क्षेत्रातही त्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे .
त्यांच्या भाजपा युवा मोर्चा युवती अध्यक्षा पदी निवड झाल्या बद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील , खासदार गिरीश बापट ,आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ , भाजपा शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे , तसेच शहरातील विविध भाजपा पदाधिकारी, विविध आघाडीचे अध्यक्ष यांनी निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: