Thursday, June 25, 2026
PUNE

बालवडकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९.३८ टक्के

पुणे, दि. २९ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाचा निकाल ९९.३८ टक्के लागला. आदित्य शेजूळ (९३.६०%) याने प्रथम, अवधूत निंबाळकर (९१.४०%) याने द्वितीय, तर अदिती दरेकर (८८.८०%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पोखरकर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
डॉ. बालवडकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी घेतलेले कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच विद्यालयाने हे यश संपादन केले आहे. विद्यार्थी, पालक आणि संस्थेचे सर्व कर्मचारी यांना या यशाचे श्रेय जाते. संस्थेत प्रात्यक्षिक शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. यापुढेही यशाची ही परंपरा कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading