बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली कोरोना पॉझिटिव्ह
बाहुबली आणि बाहुबली -२ चे दिग्दर्शक एस.एस, राजामौली आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ताप आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राजमौली यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. यावेळी प्लाझ्मा दान करण्याची इच्छाही बोलून दाखविली.

राजमौली यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मला आणि माझ्या कुटुंबाला काही दिवसांपासून ताप येत आहे हळूहळू तो कमी झाला पण आम्ही चाचणी केली. ज्यामध्ये आम्ही सौम्य कोरोना पॉझिटिव्ह आलो. पण आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी क्वारंटाईन आहोत. सध्या आम्हाला कोणतीही लक्षण दिसत नाहीत. पण तरीही आम्ही सर्व सूचनांचे पालन करीत आहोत. आम्ही अँटीबॉडी विकसित होण्याची वाट पाहत आहोत जेणेकरुन आम्ही प्लाझ्मा दान करू शकू.” असं ही त्यांनी म्हटलं आहे.
राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एनटीआर ज्युनियर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रेया सरन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
