विधू विनोद चोप्रा मुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली होती; चेतन भगतचा गंभीर आरोप
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्ये नंतर आता चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी आपले अनुभव सांगण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवूडमध्ये नेपोटिजमवरून सतत वाद होत आहेत. त्याबद्दल काही कलाकार लोकांसमोर खुलेपणाने आपला मुद्दा मांडत आहेत. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील यात उडी घेत चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधू विनोद चोप्रा यांच्यामुळे आपल्यावर आत्महत्येची वेळ आली होती असा आरोप चेतन भगत यांनी केला आहे.

चेतन भगत यांनी नुकतेच सुशांतसिंग राजपूत यांच्या ‘दिल बेचार’ या चित्रपटासंदर्भात एक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी लिहिले होते की, “सुशांतसिंग राजपूत यांचा चित्रपट या आठवड्यात रिलीज होत आहे. म्हणून मी सर्व बड्या समीक्षकांना सांगू इच्छितो की जरा भान ठेवून लिहा. “
चेतन भगत ट्विटरवर पुढे म्हणाले, “ओव्हरस्मार्ट बनू नका. मूर्खसारखे लिखाण करू नका, निष्पक्ष आणि शहाणे व्हा. आपल्या घाणेरड्या युक्त्यांचा वापर करू नका, तुम्ही अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. आता पुरे झालं. आम्ही पाहणार आहोत”.
चेतन भगत यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा (अनुपमा चोप्रा) यांनी लिहिले की, “प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो की एखादी व्यक्ती इतक्या खाली उतरू शकत नाही, पण पुन्हा तेच होतं.”
Ma'am, when your husband publicly bullied me, shamelessly collected all the best story awards, tried denying me credit for my story and drove me close to suicide, and you just watched, where was your discourse? https://t.co/CeVDT2oq47
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) July 21, 2020
अनुपमाच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना चेतन भगत यांनी विधु विनोद चोप्राने आत्महत्या करण्यास भाग पाडले याबद्दल त्यांनी खुलासा केला.
चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “मॅडम जेव्हा आपल्या पतीने मला लोकांसमोर अपमानित केले, निर्लज्जपणे माझ्या कथेचे श्रेय देण्यास नकार देत सर्व सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार स्वत: घेतले आणि मला आत्महत्या करण्याच्या वाटेवर नेले, त्यावेळी तुम्ही फक्त बघत होता, त्यावेळी तुमचे हे उपदेश कुठे होते? चेतन भगत यांच्या या ट्विटवर लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत. यामुळे लेखक चेतन भगत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
