Sunday, June 21, 2026
PUNE

रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो.सारिका रोडे

पुणे, दि. 22 – रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो.सारिका रोडे यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.भक्ति शहा-सापके यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.यावेळी सेक्रेटरी पदी असित शहा,उपाध्यक्षपदी निखिल टकले,तर खजिनदारपदी प्रवेश गुप्ता यांची निवड करण्यात आली.या ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,माजी अध्यक्ष रो.दीपक तोषणीवाल.आदी मान्यवरांच्या बरोबरच अन्य पदाधिकारी व रोटरी सदस्य (ऑनलाईन) उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष रो.सारिका रोडे यांनी आगामी काळात पर्यावरण,रोजगार,महिला सबलीकरण,रोटरी क्लब मध्ये तरुण सदस्यवाढ इत्यादी क्षेत्रात कार्य करणार असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading