Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

इन्स्टाग्रामवर 50 मिलिअन फॉलोवर्स, श्रद्धा कपूरने मराठीतून मानले आभार

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर नुकताच 50 मिलियन फॉलोवर्सचा आकडा पार केला असून आपल्या चाहत्यांना त्यांच्या या प्रेमासाठी धन्यवाद देताना श्रद्धाने सोशल मीडियावर स्वहस्ताक्षरात तीन भाषांमध्ये पत्र लिहिले आहे.

यामध्ये तीने लिहिले आहे की, “माझ्या सर्व प्रिय, जेम्स, बाबूडी, फॅन क्लब, आणि हितचिंतकांनो, तुम्ही प्रेमाने बनवलेल्या व्हिडीओ आणि पोस्ट मी पहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे इथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी रहा. कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांसोबत प्रेमाने रहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! 50 मिलियन वेळा – श्रद्धा ️”
https://www.instagram.com/p/CCsDMEPJ1xu/?utm_source=ig_web_copy_link

श्रद्धा 50 मिलियनचा आकडा पार करणाऱ्या काही मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक असण्याचे कारण हे देखील आहे की ती आपल्या या प्रभावाचा उपयोग #LockdownZoos सारख्या सामाजिक चळवळींसाठी करते आणि चाहत्यांना वेळोवेळी आग्रह करते की त्यांनी देखील प्राण्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढी मदत करावी.

श्रद्धा कपूर लवकरच रणबीर कपूरच्या सोबत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading