पुण्यात कोरोना कहर दिवसभरात तब्बल १८१२ नवीन रुग्ण, १७ मृत्यू
पुणे, दि. १६ – कोरोनाचा पुणे शहरात असलेला प्रादुर्भाव कमी होण्याची कोणतेही चिन्ह सध्या दिसत नाही. कोरोना रुग्णांच्याच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ बघायला मिळाली. गुरुवारी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत १ हजार ८१२ अशी विक्रमी भर पडली आहे. तर दिवसभरात १७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

– दिवसभरात १८१२ (ॲंटिजेन किटद्वारे-४८५) पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७६४ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात १७ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ५३६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ८० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३१८८४.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-३०८०३ आणि ससून १०८१)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०६४४.
– एकूण मृत्यू -९०६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- २०३३४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३६१३ आणि ॲंटिजेन किटद्वारे २९६९- एकूण- ६५८२
