तळवडे वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीकरीता समविषम तारखेस पार्किंग व नो पार्किंग झोन
वाकड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील थेरगाव परिसरात वाहतुकीमध्ये बदल
पिंपरी, दि.17 : – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता तळवडे वाहतुक विभागांतर्गत पिंपरी चिंचवड शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा. फायरबिग्रेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका,इ.) वगळता देहूगाव मुख्य कमान ते आंबेडकर चौक येथे समविषम तारखेस पार्किंग या ठिकाणी सम – विषम तारखेस पार्किंगचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आंबेडकर चौक ते मुख्यमंदिर व तालिम ते शिवाजी चौक येथील रस्तयावर नो पार्किंग झोन अशा प्रकारचे निर्बध घालण्यात आल्याची माहिती पिंपरी- चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.

दरम्यान, वाकड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील थेरगाव परिसरात पडवळनगर, सुंदर कॉलनी, गणराज कॉलनी, दगडुपाटिल नगर, क्रांतीवीर नगरच्या भागात कोरोना विषाणू बाधिक लोक मिळुन आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 14 जुलै ते 23 जुलै 2020 या कालावधीमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे.
त्यानुसार यापुर्वीचे निर्बंध रद्द करण्यात येऊन आता अत्यावश्क सेवेतील वाहने ( उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, वैद्यकीय सेवेतील स्टाफ, इ) खेरीज तात्पुरत्या स्वरुपातील आदेशानुसार पिंपरी सांगवी वाहतुक विभागांतर्गत कोरोना रोगाचे वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता काळेवाडी- पिंपरी या दोन गावांना जोडणारे पुल अनुक्रमे काळेवाडी पिंपरी पुल लकी बेकरी जवळ तसेच पवनेश्वर काळेवाडी या पुलावर सार्वजनिक वाहतुकीकरीता 14 जुलै 2020 ते 23 जुलै 2020 या कालावधीपर्यंत बंदी करण्यात आल्याची माहिती पिंपरी- चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.
