‘बालवीर रिटर्न्स’मध्ये नकाबपोशने केला अनन्याच्या गुप्त मिशनचा उलगडा
सुष्ट व दुष्टामधील संघर्ष सुरू झाला आहे आणि दोन्ही विश्वांमधील लढा अधिक प्रखर होणार आहे. भयराणी तिम्नसाने (पवित्रा पुनिया) अंतिम शक्ती मिळवण्यासाठी विवान (वंश सयानी) आणि नकाबपोश (देव जोशी) यांना ठार मारण्याचा निर्धार केला आहे. आगामी एपिसोड्स प्रेक्षकांना रोमांचपूर्ण घटनांसह खिळवून ठेवतील. नकाबपोशला अनन्याचे (अनाहिता भूषण) सत्य समजते, तर तिम्नसा विवानला उघडपणे आव्हान देते.

जग आणि जगाच्या संरक्षकांचा विध्वंस करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या तिम्नसासमोर मास्क घातलेला रक्षक नकाबपोश आल्याने नवीन आव्हान उभे राहते. तिम्नसा तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे रहस्य नष्ट करण्यासाठी नकाबपोशअनन्याची भूमिका साकारणारी अनाहिता भूषण म्हणाली,\’\’अनन्या ही कॉलेजला जाणारी उत्साही मुचे खरे रूप समोर आणत त्याला ठार करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. या सर्व घटना घडत असताना नवीन मुलगी अनन्याने पुढील शिक्षणासाठी भारत नगरमध्ये प्रवेश केला आहे. तिची नकाबपोश ऊर्फ देबू भैयाशी भेट होते आणि ती त्याच्याकडे आकर्षून जाते. दुसरीकडे देबू त्याच्या जीवनात तिच्या येण्यामागील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.
अनन्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी देबू कॉलेजपर्यंत तिचा पाठलाग करतो. त्याला समजते की, ती सर्व गोष्टींमध्ये खोटे बोलत आली आहे. देबू धैर्याने अनन्याचा सामना करतो आणि अनन्याच्या गतकाळाबाबत समजल्यानंतर तो अचंबित होतो.
अनन्या कोण आहे? तिचे मिशन काय आहे? तिने जगाचा विध्वंस करण्यासाठी तिम्नसासोबत हातमिळवणी केली आहे का?
नकाबपोश व देबू भैयाची भूमिका साकारणारा देव जोशी म्हणाला,”देबू उर्फ नकाबपोशने तिम्नसाला ठार करू शकणा-या शस्त्रापर्यंत पोहोचण्याकरिता कोड्यांचे निराकरण करण्याचे त्याचे मिशन सुरू ठेवले आहे. भारत नगरमधील प्रत्येकाच्या जीवनात अनन्याच्या प्रवेशामुळे देबू काहीसा गोंधळून गेला होता. पण आगामी एपिसोड्समध्ये त्याच्या शंका ख-या ठरणार आहेत. तो अनन्याचा खोटेपणा उघडकीस आणल्यानंतर तिचा सामना करतो. अनन्याची खरी ओळख जाणून घेणे अत्यंत रोमांचक असणार आहे. पाहत राहा ‘बालवीर रिटर्न्स‘.”
अनन्याची भूमिका साकारणारी अनाहिता भूषण म्हणाली,”अनन्या ही कॉलेजला जाणारी उत्साही मुलगी आहे. तिचा एक मोठा उद्देश आहे, ज्यासाठी ती भारत नगरमध्ये आली आहे. आतापर्यंत तिने सर्वांपासून तिची खरी ओळख लपवून ठेवली आहे. आगामी एपिसोड्समध्ये ती अशा एका टप्प्यावर येणार आहे, जेथे तिला तिच्या खरी ओळखीबाबत उलगडा करावा लागणार आहे. पण खरा प्रश्न असा आहे की, ती खरंच देबूला सर्वकाही सांगेल का? या आव्हानात्मक काळादरम्यान शूटिंग करणे अवघड राहिले आहे, पण आम्ही सर्वांनी आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. मी आशा करते की, आमचे प्रेक्षक नवीन एपिसोड्स पाहण्याचा आनंद घेतील.”
