Wednesday, September 2, 2026
PUNE

आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश

पुणे, दि. १६ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज आणि अँग्लो उर्दू बॉईज स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उच्च बारावी परिक्षेत यश मिळवले.

अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज चा निकाल ९६.३५ टक्के इतका लागला. अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य आयेशा शेख , उपप्राचार्य गफार सय्यद यांनी ही माहिती पत्रकाद्वारे कळविली . विज्ञान शाखेतून शेख अनम फातिमा ९१.५४ टक्के गुण मिळवून प्रथम आली . कला विभागात बोरजी साफिया हुसेन ९०.१५ टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कॉमर्स विभागात शेख बिबी फातिमा इरफान आणि पारकर फइझा सादिक यांना ९० टक्के गुण मिळाले आहेत. एम सी व्ही सी मधे बसराई अर्वा युसुफ ८९.०८ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

अँग्लो उर्दू बॉईज् स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चा निकाल ८८.४७ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेचा ९४.४७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.६१ टक्के तर कला शाखेचा ४८ टक्के निकाल लागला. मुख्याध्यापक परवीन शेख यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. अन्सारी मोईझ महंम्मद हसन ९२ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात शेख सबीर सत्तार ८२ टक्के मिळवून प्रथम आला तर ६६ टक्के गुण मिळवून खान दीबा अली हुसेन कला शाखेत प्रथम आली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार ,उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,सचिव डॉ लतीफ मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading