fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

औरंगाबाद मुख्य पोस्ट ऑफिस मधून बी के राहुल (मुख्य अधीक्षक) चे नागपूरला पलायन

प्रभारी मुख्य अधीक्षक त्यांच्या हस्ते होणार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा लावणार.

औरंगाबाद, दि. १५ – मुख्य पोस्ट अधीक्षक बी के राहुल ह्यांनी नूतनीकरणाच्या नावाखाली कार्यालयातील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा काढून ठेवल्या त्या प्रतिमा पुन्हा लावण्यात याव्या या करिता एका महिला अधिकारी यांनी नवीन प्रतिमा घेऊन ती कार्यालयात लावावी या करिता मुख्य पोस्ट अधीक्षक बी के राहुल यांची भेट घेतली व प्रतिमा लावण्याची विंनती केली होती परंतु केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे सांगत प्रतिमा लावण्यास नकार दिला ही बाब सोशल मीडिया वर सर्वत्र व्हायरल झाल्याने भीमसैनिकांचे वादळ मुख्य पोस्ट कार्यालयात धडकणार असल्याने बी के राहुल ह्यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी नागपूर येथे तात्काळ पलायन केले.

आज गुणरत्न सोनवणे,अविनाश डोंगरे,दिनेश नवगिरे,सोमु भटकर,स्वप्नील गायकवाड,नितीन साळवे,अक्षय जाधव,अ‍ॅड.पँथर अतुल कांबळे सह आम्ही भेट घेऊन सत्यता जाणून घेतली असता असा कुठलाही शासन निर्णय नाही, बी के राहुल (मुख्य अधीक्षक) हे जाणीवपूर्वक प्रतिमा लावण्यास टाळत होते हे समोर आले आहे.
कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक असादुल्लाह शेख व श्री ताठे यांची भेट घेऊन सत्यता जाणून घेतली लवकरच प्रभारी मुख्य पोस्ट अधीक्षक हे औरंगाबाद येथे रुजू होणार आहेत त्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक कार्यालयीन स्थरावर प्रतिमा लावण्यात येतील व मुख्य पोस्ट अधीक्षक यांच्या हस्ते प्रतिमेच्या अनावरणाचा कार्यक्रम होईल असे त्यांनी सांगितले.ह्या बाबत नवीन मुख्य पोस्ट अधीक्षक ह्यांच्याशी चर्चा केली असता त्यानी रुजू होताच प्रतिमेचे अनावरण करू असे सांगितले आहे.
बी के राहुल (मुख्य अधीक्षक) ह्याने कुठलाही शासन निर्णय नसतांना खोटी माहिती देत प्रतिमा लावण्यास टाळाटाळ केली असल्याचे स्पष्ट झाले असल्याने ह्या प्रकरणी कायदेशीर फिर्याद व वरिष्ठ कार्यालयास याची तक्रार करण्याची प्रक्रिया केली जात आहे.
बी के राहुल (मुख्य अधीक्षक) ह्याची नागपूर येथे बदली झाली असली तरी सदरच्या कृत्याप्रकरणी त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल व अश्या प्रकारे दिशाभूल करून,खोटे बोलून केवळ मनातील जातीय आकसापोटी कुणी महापुरुषांचा अवमान करत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी भीमसैनिक तत्पर आहेत.
समाज माध्यमावर ह्या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या व पाठपुरावा करणाऱ्या भीमसैनिकांच्या भूमिकेमुळे हे प्रकरण समोर आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading