Monday, June 22, 2026
PUNE

अत्यावश्यक सेवा पास देण्यासाठी ४०० रुपये घेणाऱ्या राहुल शितोळे व संबधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करा – संजय कवडे यांची मागणी

पुणे, दि. १५ – अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांकडून ४०० रुपये घेणाऱ्या राहुल शितोळे व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पुणे शहर ( जिल्हा ) वाहतूक सेवा संघटनाचे अध्यक्ष संजय रघुनाथ कवडे यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात संजय कवडे यांनी म्हटले आहे की, पुणे शहरात १ एप्रिल पासून ते १५ एप्रिल पर्यंत sanitize रिक्षा पास पुणे शहरातील रिक्षा चालकांना वाहतूक शाखा पुणे यांच्या मार्फत देण्यात आला त्यानंतर पासची मुदत वाढवून रिक्षा चालकांना अत्यावश्यक सेवा देण्यात आली .त्यावेळेस हे सर्व पास वाहतूक शाखा यांच्या मार्फत रिक्षा चालकांना मोफत देण्यात आले .
पुणे शहरात प्रशासनाने १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळासाठी लॉक डाउन आहे. व या १० दिवसाच्या City GlideAuto चे राहुल शितोळे यांनी ऑनलाईन फॉर्म भरून ४०० रु Googlepay द्वारे स्वतःच्या Account मध्ये रिक्षा चालकांना पास देण्यासाठी भरण्यास सांगितले व त्याचं रिक्षा चालकांना वाहतूक विभागाने आपत्कालीन पास दिला हा सर्व प्रकार पाहता पुणे शहरातील रिक्षा चालकांनी १ एप्रिल ते आजतागायत सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करून मीटर ने व्यवसाय केला . वाहतूक शाखा जर मोफत पास देत असेल व त्या पासवर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्याची सही असेल तर राहुल शितोळे ४०० रुपये कोणाच्या परवानगीने घेत आहे. रिक्षा जर मीटर प्रमाणे व्यवसाय करत आहे . व यापूर्वीच्या लॉकडाऊन काळात प्रशासनाने कोणतीही फी आकारली नव्हती .
पुणे शहरात प्रशासनाने १३ जुलै ते २३ जुलै २०२० या १० दिवसाकरिता लॉकडाऊन घोषित केले आहे . तर वाहतूक शाखेने त्या पासवर ०१ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत कशी काय दिली ? याची चौकशी केली पाहिजे पुणे शहरामध्ये रिक्षा चालकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या अनेक रिक्षा संघटना आहेत .
यांना कोणालाही विश्वासात न घेता अत्यावश्यक रिक्षा पास चे वाटप करण्यात आले . व पास मोफत सांगून Googlepay द्वारे पैसे घेण्यात आले . हा प्रकार म्हणजे सध्य परिस्तिथी मध्ये लोकांना उत्पन्न नाही . व्यवसायाची शाश्वती नाही तरी रिक्षा चालकांकडून राहुल शितोळे व प्रशासनाने संगन मताने पैसे वसूल केल्याचे दिसत आहे .
हा प्रकार गंभीर असून रिक्षा चालकांकडून Googlepay द्वारे घेण्यात आलेले पैसे त्यांना परत करण्यात यावे . व तत्सम संबंधित अधिकारी त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावर व राहुल शितोळे वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading