Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठमोळा हृषिकेश जोशी

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आर माधवन आणि अमित साध स्टारर वेबसीरिज ‘ब्रिद’ चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्रिद’ ही वेब सिरीज 2018 मध्ये प्रदर्शित झाली असून, या वेबसिरीज मधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. मराठी अभिनेता ‘हृषिकेश जोशी’च्या कामाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले होते.

दरम्यान, येत्या 10 जुलै रोजी ‘ब्रीद’ वेबसिरीजचा दुसरा ‘ब्रीद: इनटू द शेडोज’ हा सिझन प्रदर्शित होणार आहे. पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसऱ्या सिझन मध्ये हृषिकेश जोशी महत्त्काच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावेळी बॉलीवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन त्याच्या सोबत असणार आहे.

‘पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे. त्यानुसार दुसऱया सिझनमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली’ असे हृषिकेशने सांगितले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

त्यामुळे आता ‘ब्रीद: इनटू द शेडोज’ या दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरश: धमाल करणार हे नक्की.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading