Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई, दि. 8 – मुळ नाव अहमद जाफरी परंतु जगदीप या नावाने प्रसिद्धी मिळालेले विनोदी अभिनेता जगदीप यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले.

दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांच्या अफसाना’या चित्रपटातुन 1951 साली एक्स्ट्रा म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्या जगदीपनी ‘दो बिघा जमीन’, ‘अब दिल्ली दूर नहीं,मुन्ना,हम पंछी एक डाल के आदि चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केल्या.

त्यानंतर तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी ‘ ‘भाभी’,’बरखा’, ‘बिंदिया’ आदी काही चित्रपटांत मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. परंतु हिरो बनण्यासाठी लागणारे देखणेपण व शरीरयष्टी आपल्याकडे नाही हे लक्षात आल्यावर ‘ब्रम्हचारी’ या हिंदी चित्रपटाव्दारे त्यांनी विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली आणि त्यात त्यांना यशही मिळाले. अनेक चित्रपटांत त्यांनी विनोदी भूमिका केल्या मात्र ‘शोले’ मधील सुरमा भोपाली या त्यांच्या भूमिकेने त्यांना अजरामर केले.

‘ची केली रे पतंग ‘ ‘चल उड जा पंछी’, पास बैठो तबीअत, ‘इन प्यार की राहों में ‘ ही जगदीपवर चित्रित झालेली गाणी आजही लोकपिय आहेत.

एका मुलाखती दरम्यान त्यांनी एक किस्सा सांगितला होता. ‘ हम पंछी एक डाल के’ या चित्रपटाच्या सर्व कलाकार ,तंत्रज्ञाना भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी खास निमंत्रित केलं होतं. त्यावेळी प्रत्येक कलाकाराशी ओळख करून घेत नेहरू स्वहस्ते प्रत्येकाला भेटवस्तू प्रदान करत होते.

कलाकारांच्या ओळीत सर्वात शेवटी उभे होते जगदीप. ज्यावेळी जगदीप नेहरूंसमोर उभे राहीले ; तेव्हा भेटवस्तू संपल्या होत्या. अनवधानाने त्यांच्या सचीवा कडून चित्रपटातील एकुण कलाकारांची संख्या एका अंकाने कमी गणली होती. परंतु नेहरूंनी जगदीपना नाराज केलं नाही, त्यांनी आपली छोटी काठी जगदीपना भेट दिली. जगदीप यांच्यासाठी तो अनमोल नजराणाच होता. त्यांनी ती छडी मला दाखवली सुध्दा होती.

तीन एक वर्षापुर्वी ‘दहा क्लासिक्स ‘ या पुस्तकातील ‘ दो बिघा जमीन ‘ विषयी जगदीपशी बोलणं झालं होतं व त्यांनी या चित्रपटासंदर्भातील आठवणी सांगितल्या होत्या.

बूगी वूगी हा यशस्वी, लोकप्रिय टिव्ही रिआलटी कार्यक्रम सादर करणारे जावेद व नावेद जाफरी हे जगदीप यांचे पुत्र. जावेदने अनेक चित्रपटातुन अभिनय देखील केला आहे. दुसरी पत्नी नझमापासून जगदीपना मुस्कान नावाची मुलगी देखील आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading