Tuesday, September 1, 2026
MAHARASHTRA

कोरोना – राज्यात आज ६ हजार ८७५ नवीन रुग्ण, २१९ मृत्यू तर ४ हजार ६७ कोरोनामुक्त

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आकडा १ हजार पार

मुंबई, दि.९ : राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे-८, ठाणे मनपा-२०, नवी मुंबई मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-३, भिवंडी-निजापूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-३, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-९, पनवेल मनपा-८, नाशिक-३, नाशिक मनपा-१, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, जळगाव-६, जळगाव मनपा-१, नंदूरबार-२, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४, सोलापूर मनपा-४, सातारा-३, जालना-१, लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

९ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती

– दिवसभरात १००६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ५८१
– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – १५५८९
– आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १६
– पुण्यातील एकूण मृत्यू – ७८६
– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ४०२
– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ७५
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २५१७४
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ८८०९
– आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ३९७९ + ७५५ रॅपिड टेस्ट
– आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या -१५०६२८

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading