fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील स्टार्टअप सुरू करावे -डॉ. अभय जेरे

पुणे, दिः 6 “ कोविड-19 या संसर्गजन्य परिस्थितीत युवकांनी ‘मॅप’ म्हणजेच मेंटॉर, अ‍ॅट्यूट्यूड आणि पॅशन या तीन गोष्टीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, सृजनात्मकता व कल्पकतेचा वापर करून देशात जागतिक स्तरावरील स्टार्टअप सुरू करावे.” असा सल्ला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मुख्य अभिनव अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे फॅकल्टी ऑफ सायन्स, स्कूल ऑफ पॉलिटेक्निक अ‍ॅण्ड स्किल डेव्हलपमेंट, स्कूल ऑफ फार्मसी व स्कूल ऑफ डिझाईनसाठी आयोजित ‘ इंडक्शन प्रोग्राम 2020’ वेबिनाच्या माध्यमातून संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी. राव, प्र-कुुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि विद्यापीठाच्या रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. कृष्णा वर्‍हाडे हे ऑनलाईन उपस्थित होते.
डॉ. अभय जेरे म्हणाले,“ युवकांचा देश संबोधल्या जाणार्‍या भारतात 31 हजार स्टार्ट अप सुरू झाले आहे. अशा वेळेस उच्च गुणवत्तापूर्ण स्टार्टअप सुरू करण्यावर आम्हाला भर द्यावा लागेल. तसेच, भविष्यात नॉलेज बेस सोसायटी आणि नॉलेज बेस इकॉनॉमी असणार आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष दयावे. संपूर्ण जगात अमेरिका व चीन येथे सर्वाधिक स्टार्टअप सुरू झाले आहेत. त्या नंतर भारताचा नंबर लागतो.”
“ वर्तमान स्थिती पाहता देशातील शिक्षण पद्धतीत आम्हाला आमुलाग्र बदल आणावे लागेल. त्यात प्रॅक्टिकल आणि अनुभवावर अधिक भर देणारी असावी. तसेच, विज्ञान, वाणिज्य आणि कला क्षेत्राबरोबरच व्यावसायिक पाठ्यक्रमात बदल करावे लागतील. आज देशात फक्त 3 ते 4 टक्के युवक रोजगारक्षम आहेत. आता या स्थितित बदल घडवून 90 टक्के पेक्षा अधिक युवकांना रोजगारक्षम करणारी शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा.”
“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आत्मनिर्भर भारत करावयाचे आहे. आत्मनिर्भर म्हणजेच आम्हाला देशातच सृजनात्मक गोष्टींची निर्मिती करावयाची आहे. जगात ज्या समस्या आहेत त्याचे समाधान उच्च शिक्षित युवकांना करावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा. त्या समस्यांवर विचार मंथन करून अध्ययनाने ती समस्या सोडवावी. यासाठी कठोर परिश्रम आणि सदैव शिकत रहाण्याचे गुण त्याच्या अंगी असावे.” असे ही ते म्हणाले.
यावेळी आयोजित वेगवेगळ्या सत्रात सिस्को सिस्टीमचे प्रादेशिक प्रमुख मनोज जोशी यांनी ‘पुढे जाणे… ’ या विषयावर विचार मांडले , भारत सरकारच्या एनएसडीसीच्या वर्ल्ड स्किल्स इंडियाचे प्रमुख रंजन चौधरी व भारत सरकारच्या एनएसडीसीच्या वर्ल्ड स्किल्स इंडियाचे सल्लागार निहाल रूस्तगी यांनी ‘चांगल्या भविष्यसाठी कौशल्य अनलॉक करा’ या विषयावर विचार मांडले.
 डब्ल्यूपीयूच्या फॅकल्टी ऑफ सायन्सच्या सहयोगी अधिष्ठात शुभलक्ष्मी जोशी व एमआयटी स्कूल ऑफ पॉलिटेक्निकच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. रोहिणी काळे यांनी आपले विचार मांडून युवकांना प्रेरित केले.
डॉ.कृष्णा वर्‍हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेबिनार इंडक्शन प्रोग्राम मध्ये  विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होतो. यामध्ये  प्रश्नोत्तर झाले. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading