Wednesday, June 24, 2026
ENTERTAINMENT

विधानपरिषद निवडणुकीसाठी अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांच्या नावाची चर्चा

पुणे, दि. 5 – सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य निवडीसाठी विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्ष ‘कला’ क्षेत्रातील व्यक्तींना विधान परिषदेत संधी देत आहे.
नुकतीच लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. व येत्या मंगळवारी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचाही निसर्ग आॅफिस पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.
त्यामुळे ‘कला’ क्षेत्रातील कोणत्या कलावंतांला विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय झाला आहे.

शिवसेनेकडून ही अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिकीरीच्या ‘कळवा-मुब्रा’ सारख्या मतदार संघात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी काट्याची टक्कर दिली आहे.
परंतु पराभवाने न खचता अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद पुन्हा त्याच जोशाने चांगले काम करीत आहेत. शिवसैनिकांत उत्साह भरण्याचे काम करीत आहेत.
महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष वाढीसाठी लोकप्रिय अभिनेत्री व शिवसेना पक्षाच्या कट्टर शिवसैनिक अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांच्या नावाची चर्चा ‘कला‌’ क्षेत्रातून जोर धरु लागली आहे. विधानपरिषद निवडणुकीत अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांना उमेदवारी मिळावी यासाठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व युवा सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे.
अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावेळी त्यांना ‘मातोश्री’ वरुन चांगल्या संधीचा शब्द ही देण्यात आला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे.
अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगली-कोल्हापूर महापूरादरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोना सारख्या संसर्ग रोगाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असताना महाराष्ट्रभर अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी स्वत: रस्तावर उतरुन राज्यशासनाच्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नियमाचे पालन करण्याचे कळकळीची विनंती केली होती.
अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी लाॅकडाऊन काळात दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई व अहमदनगर जिल्ह्यातील जनतेसाठी स्वत: रस्त्यावर उतरुन अन्नदान, माॅस्क वाटप, सॅनिटायझर वाटप केले. व रस्त्यावर सेवा बजावणा-या पोलिस काॅलनीमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे.
अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी अपंग कलाकारांच्या प्रश्नावरही आवाज उठवून त्यांना दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्वापतोरी मदतीचा हात दिला आहे.
अशी लोकप्रिय अभिनेत्री दिपाली सय्यद विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडूण गेल्यानंतर निश्चित कलाकारांच्या प्रश्नावर आवाज उठवतील.
अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी आत्ता पर्यंत कोणत्याही पदावर नसताना दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र भर 50 लाखांची मदत जनतेसाठी केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट व युवा सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कडे मागणी ही करण्यात आली आहे. सध्या त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading