Monday, June 22, 2026
PUNE

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा वाढदिवस पुण्यात साजरा

पुणे, दि. ५ – लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ,केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांचा ७४ वा वाढदिवस पुण्यात साजरा करण्यात आला. साधू वासवानी चौकातील कार्यालयात हा कार्यक्रम रविवारी दुपारी झाला.यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन वंचितांना न्याय देण्याची शपथ घेण्यात आली तसेच केक कापण्यात आला. कार्यकर्त्यांना सामाजिक विषयाची पुस्तके भेट देण्यात आली.

पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे,प्रवक्ते के.सी. पवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण, लीगल सेल अध्यक्ष अॅड. अमित दरेकर, माधव यादव, अप्पा भोसले, आदिनाथ भाकरे, अर्जुन गायकवाड, सुरेश कडू, प्रशांत ओसवाल, रझिया खान, सविता रणदिवे,वैशाली वाघमारे, समीरा शेख, मुमताझ शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading