Sunday, June 21, 2026
MAHARASHTRAPUNE

पुणे विभागात आज 1855 रूग्णांची वाढ; एकूण 32886 कोरोनाबाधित.

पुणे, दि. 4 – पुणे विभागातील 19 हजार 652 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 हजार 886 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 45 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 617 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.76 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 27 हजार 280 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 16 हजार 156 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.22 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.04 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 855 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 548, सातारा जिल्ह्यात 63, सोलापूर जिल्ह्यात 188, सांगली जिल्ह्यात 40 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 251 रुग्ण असून 779 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 422 आहे. कोरोनाबाधित एकूण 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 1 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 735 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 979 आहे. कोरोनाबाधित एकूण 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 450 रुग्ण असून 257 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 181 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 904 कोरोनाबाधित रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading