Monday, August 31, 2026
ENTERTAINMENT

कृष्‍णा भारद्वाजने सांगितले रामाच्‍या भूमिकेला खास बनवणा-या गोष्‍टींमागील गुपित

सोनी सब लवकरच प्रेक्षकांच्‍या आवडत्‍या मालिकांचे नवीन एपिसोड्स सादर करणार आहे. चॅनेलवरील सर्वांची आवडती कालिक मालिका तेनाली रामा लवकरच नवीन एपिसोड्ससह परतणार आहे, जेथे रामा त्‍याची अद्वितीय बुद्धी व हुशारीसह विजयनगरमध्‍ये येणा-या समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे.

प्रेक्षकांना त्‍यांचा लाडका पंडित राम कृष्‍णाची खूप आठवण येत आहे. तो प्रेक्षकांना हुशारी व अधिक आत्‍मविश्‍वासासह प्रत्‍येक स्थितीमधून बाहेर कसे पडावे, याचे ज्ञान देतो. प्रेक्षकांनी मालिका आणि मालिकेमधील पात्रांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. रामाची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज त्‍याची भूमिका रामाला खास बनवणा-या गोष्‍टींबाबत आणि तो रामाच्‍या भूमिकेमधून काय शिकला याबाबत सांगत आहे.

पंडित राम कृष्‍णा हा श्री कृष्‍णदेवरायच्‍या दरबारामधील भारतीय कवी, विद्वान व खास सल्‍लागार होता. ही भूमिका साकारत कृष्‍णा भारद्वाजने प्रेक्षकांसमोर पंडित रामाच्‍या अनेक कथा सादर केल्‍या आहेत आणि प्रत्‍येक कथेमधून त्‍यांना प्रेरित केले आहे. पण या भूमिकेचा कृष्‍णा भारद्वाजच्‍या वास्‍तविक जीवनावर देखील मोठा प्रभाव पडला आहे. तो रामाच्‍या अनेक प्रभावशाली गुणांबाबत सांगत आहे आणि त्‍यापैकी एक म्‍हणजे रामा कोणत्‍याही स्थितीमध्‍ये आनंदी राहतो. कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला,”रामाने मला जीवनाबाबत अनेक गोष्‍टी, तत्त्वे आणि समस्‍येसाठी कशाप्रकारे उपाय शोधून काढावा हे शिकवले आहे. या भूमिकेने मला शिकवलेली सर्वात महत्त्वाची गोष्‍टी म्‍हणजे जीवनात कशाप्रकारे आनंदी राहावे. मी तेनाली रामाचा भाग होण्‍यापूर्वी इतका आनंदी राहत नव्‍हतो. ही भूमिका साकारताना मी एक आनंदी व्‍यक्‍ती बनलो आहे आणि मी जीवनामध्‍ये अधिक हसतो व माझ्यामध्‍ये जीवनाप्रती वेगळाच दृष्टिकोन निर्माण झाला आहे. रामा कोणत्‍याच गोष्‍टीची चिंता करत नाही आणि जीवनात असेच असले पाहिजे.

प्रत्‍येक कथेमधून प्रेक्षकांना नवीन काहीतरी शिकायला मिळते. रामा त्‍याची बुद्धी व हुशारीचा वापर करत जटिल समस्‍यांचे निराकरण करतो. पण अशी एक विशिष्‍ट कथा होती, जिने कृष्‍णा भारद्वाजला आयुष्‍यभर स्‍मरणात राहिल अशी शिकवण दिली. याबाबत बोलताना तो म्‍हणाला,”एका एपिसोडमध्‍ये महाराज कृष्‍णदेवराय रामाला विजयनगरमधील ८ मूर्ख व्‍यक्‍तींचा शोध घेण्‍यास सांगतात. रामा उत्तर देतो की, सर्वात मोठे मूर्ख स्‍वत: पंडित रामकृष्‍णा आणि सम्राट कृष्‍णदेवराय आहेत. यामागील विचार होता की, ज्ञान असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, आपल्‍यापेक्षा कमकुवत असलेल्‍या इतरांचा विचार हाच मोठा मूर्खपणा आहे. ही शिकवण मी नेहमीच स्‍मरणात ठेवतो आणि माझ्या वास्‍तविक जीवनामध्‍ये त्‍याचा अवलंब करतो.

कृष्‍णा भारद्वाज त्‍याच्‍या वास्‍तविक जीवनामधील रामा भूमिकेच्‍या महत्त्वाबाबत बोलताना म्‍हणाला,”ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. मी प्रामाणिकपणे रामामध्‍ये सामावून जातो, कारण मी माझ्या बालपणापासूनच आध्‍यात्मिक व्‍यक्‍ती राहिलो आहे. चिंतन, आत्‍मसंयम, तत्त्वज्ञान या गोष्‍टींनी मला नेहमीच आकर्षून घेतले आहे. रामा जीवनाच्‍या तत्त्वज्ञानी व आध्‍यात्मिक पैलूंसह प्रत्‍येक समस्‍येचे निराकरण करतो आणि मी देखील वास्‍तविक जीवनात तसेच करतो. आमचे निर्माते अनेकदा म्‍हणतात की, या मालिकेचा प्रत्‍येक कलाकार वास्‍तविक जीवनात त्‍यांच्‍या संबंधित भूमिकांप्रमाणेच वागतात. मला देखील माझ्या चाहत्‍यांकडून संदेश मिळतात की, मी वास्‍तविक रूपात पंडित रामकृष्‍णाचा पुनर्जन्‍म आहे. ते माझ्याकडे खरा रामा म्‍हणून पाहतात.

कृष्‍णा भारद्वाज पुढे म्‍हणाला,”दीर्घकाळानंतर पुन्‍हा एकदा रामाचा लुक धारण करण्‍याचा आणि भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही तेनाली रामाच्‍या शूटिंगसाठी परतलो असलो तरी सोनी सब व प्रॉडक्‍शनने सेटवर नियम अनिवार्य करत संपूर्ण टीमच्‍या सु‍रक्षिततेची काळजी घेतली आहे. आम्‍ही सर्व या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत आणि लवकरच नवीन एपिसोड्स सादर करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading