Monday, August 31, 2026
PUNE

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु. 

पुणे, दि. 3 – आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) चालवण्यात येणारी महानगरपालिकेची इ लर्निंग शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ठरली आहे. काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेली हि शाळा आधुनिकतेची कास धरून गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव प्रेरित करते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. राजीव गांधी इ लर्निंग स्कूलचा निकाल मार्च महिन्यात देण्यात येतो व नवीन वर्षाची शाळा १ एप्रिल पासून सुरु होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही व मुलांचे एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक नुकसान झाले. परंतु आता लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून त्यामुळे शिक्षक व कर्मचारी शाळेवर येण्यास सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते व ज्यांच्या संकल्पनेतून शाळा साकारली ते आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी इ लर्निंग मधील विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यास १६ जून पासून सुरुवात करण्यात आली आहे.
ज्युनियर केजी ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना एजुमित्र व दीक्षा अँपद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येते. वेळापत्रक तयार करून सर्व विध्यार्थ्यांना देण्यात आले असून प्रत्येक तासानुसार वेगेळापत्रकाप्रमाणे शिक्षक शालेय वेळेत विध्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे विध्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने घरातच भरणाऱ्या ऑनलाईन शाळेचा आनंद घेत असून शाळेचा युनिफॉर्म परिधान करून न चुकता शिक्षण घेतात, अशी माहिती शाळेचे व्यवस्थापक अरुण कामठे व एफसीबा मोरे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading