Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

‘कोविड -१९’चा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

मुंबई, दि.2: कोविड -१९ विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार असून कोविड -१९ नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार , उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading