विद्यार्थ्यांनी लुटला गोष्टी ऐकण्याचा आनंद !
पुणे, दि. 2 – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल मध्ये ‘वी आर इन धिस ट्रगेदर’ टिम च्या वतीने विद्यार्थ्यांना गोष्टीचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली.
वैशाली कुलकर्णी यांनी ‘झूम’ अॅपद्वारे मुलांना दोन गोष्टी सांगितल्या ‘हमीद कहाँ गया रे तू! आणि’ कामचोर’ या गोष्टींमधून विद्यार्थ्यांनी बोध घेतला आणि अभिवाचनाचा आनंद लुटला. या गोष्टीतून मैत्री कशी असावी? या कोरोनाच्या संकंटात आपल्या मित्रांची कमतरता,मैत्री ची गरज,याची जाणीव करून दिली. तसेच ‘कामचोर’ गोष्टीद्वारे मुलांच्या काम करण्याची पद्धत याचे हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे केले.

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल च्या 30 विद्यार्थीनींना मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी ही संधी प्राप्त करून दिली. कार्यकमानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यकमांत समन्वयाचे कार्य सौ.रईस सुंडके यांनी केले.विद्यार्थीनींना हा कार्यकम फार आवडला तसेच मुख्याध्यापकांचे आभार मानले.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,सचिव लतीफ मगदूम यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.
