Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

Big news – 1 जुलै पासून काही सवलती; मात्र लॉकडाउन कायम – मुख्यमंत्री

मुंबई, 28 जून – राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते बोलत आहेत. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना 1 जुलै पासून अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं आवाहन करत आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरे यांच्या Live मधील प्रमुख मुद्दे

– कोरोनाशी लढत असता निसर्ग चक्रीवादळ आले. रायगडमध्ये हे वादळ धडकले. रायगडची पाहणी केली असता भयान असे चित्र होते

– ३० तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. ३० जूननंतर काय होणार आहे. लॉकडाउन हा शब्द आता बाजूला ठेवायचा आहे.

– हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण धोका अजून टळलेला नाही. आपण अनलॉकची सुरूवात केली आहे पण धोका अजूनही कायम आहे.

– दुकानं उघडली म्हणून गाफील राहू नका, कोरोना आ वासून उभा आहे. तुम्ही जर घराबाहेर पडला तर कोरोनाचा धोका हा कायम आहे.

– काही ठिकाणी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, ती सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठा, उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहे.

– आपला शेतकरी अहोरात्र अफाट मेहनत करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या आहे. यांची गंभीर दखल घेतली आहे. जे बियाणे पेरले ते उगवलेच नाही. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पण पैसे येणार कुठून?

– कर्जमुक्ती थांबली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू झाला त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे लांबली होती. आता परत कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुन्हा पुरवला जाणार आहे.

– ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे वाटले, त्या कंपन्या दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.

– आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे, मी पंढरपूरसाठी चाललो आहे.

– ज्यांनी शेतकऱ्यांनी फसवलं त्यांच्यावर कडक कारवाई करणार

– आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे.

– दहीहंडी मंडळांनी स्वत:हुन थर न लावण्याचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. याला सामाजिक जाणीव म्हटले जाते.

– गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली, त्यांनी एकसुरात सांगितलं की, सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा होणार आहे.

– अनेक ठिकाणी गणेशची मूर्तीही मोठी असते. त्यामुळे चार फुटांची मूर्ती असावी असा सल्ला मी दिला आहे. त्यामुळे जास्त लोकांची गर्दी जमणार नाही. लोकमान्य टिळकांनी जी चळवळ सुरू केली होती, त्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading