Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

जाणून ध्या; पडळकर आणि फडणवीसांबद्दल शरद पवार काय म्हणाले

योग्य काळजी घेतली तर कोरोनाची भीती नाही

सातारा, दि. २७ – लोकांनी बाजूला केलेल्या माणसांची दखल का घ्यायची. अशा लोकांची दखल घेण्याची गरज नाही. गोपीचंद पडळकरांचा त्या त्या वेळेस लोकांना उत्तर दिले आहे.’ तसेच देवेंद्र फडणवीसांकडे वेळ खूप असल्यामुळे काहींना काही प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांवर लगावला. सातारा येथे पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. पण यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतले. पण आता राज्यात परप्रांतीय मजूर येण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्यात आता ३० टक्के लोक उपस्थित राहत आहेत आणि तीन-चार आठवड्यांनी ६०-७० टक्के लोक उपस्थित राहतील, अशी खात्री पवार यांनी व्यक्त केली. तसेच अर्थव्यवस्था रुळावर आणणे गरजेच आहे. त्यामुळे कारखाने चालू होण आवश्यक आहे. कारखाने चालू न होणे हे महाराष्ट्रासह देशांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे पवार म्हणाले. तसेच अशा परिस्थितीत योग्य काळजी घेतली तर कोरोनाची भीती नाही असं देखील पवार यांनी सांगितले.

भारत-चीनमधील तणाव संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘भारत-चीन मुद्दा गंभीर आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण नको.’ तसेच यावेळी इंधन दरवाढीवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होणे सर्वसामन्यांसाठी त्रासदायक असल्याचे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading