fbpx

CBSC आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द; सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि. 25 – सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएससी (CBSC) आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा कधी होणार होणार की रद्द केल्या जाणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशभरात CBSC आणि ICSE बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: