fbpx

शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगा महत्वाचा – अभिनेत्री अदिती येवले

शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमित योगा करते, लॉकडाऊन मध्ये पण न चुकता मी नियमित रोज सकाळी मी योगा करायचे, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहून स्वतःला फिट ठेवण्यास योगा अतिशय फायदेशीर ठरल्याचे मत अभिनेत्री अदिती येवलेने व्यक्त केले.


कला क्षेत्रातली चढाओढ, ताणताणाव तसेच शुटींगच्या वेळा सांभाळून स्वतःला फिट ठेवणे अश्या अनेक गोष्टी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना सांभाळाव्या लागतात, काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्तेमुळे संपूर्ण जग हळहळले, त्यामागचे कारण डिप्रेशन, ताणताणाव असे बोलले जात आहे त्यामुळे यापासुन दूर राहण्यासाठी योगा हा अतिशय फायदेशीर आहे, पाश्चिमात्य देशातही आता अनेकजण योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: