fbpx

धक्कादायक Tiktock स्टार सिया कक्कडची आत्महत्या

नवी दिल्ली, दि. 25– काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आज 16 वर्षीय सोशल मीडिया स्टार सिया कक्करने आत्महत्या केली आहे. सिया सोशल मीडियावर टिकटॉक व्हिडिओमुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती. या बातमीने सर्वानाच धक्का बसला असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सियाने काल रात्री तिचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी एका गाण्याबद्दल चर्चा केली होती. पण सियाच्या आत्महत्येची बातमी ऐकून अर्जुनला ही धक्का बसला. अर्जुन म्हणाला की, तिचा फोन आला तेव्हा ती ठीक होती आणि अस्वस्थ देखील वाटत नव्हती. कळत नाहीये की सियाने हे पाऊल का उचलले.’

सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. वास्तविक, सियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. जी तिची शेवटचे पोस्ट देखील आहे. इंस्टाग्रामवर सियाचे हजारो फॉलोअर्स आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: