fbpx

खेळांच्या मैदानांचा विकास करून सोयी-सुविधांकरिता समिती

क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांची माहिती

मुंबई, दि.२४ : राज्यातील मैदानांचा विकास करून नवयुकांना सोईसुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात आज राज्यातील मैदांनाचा आढावा घेण्याकरिता आयोजित बैठकीत श्री.केदार बोलत होते. यावेळी नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उद्योग खानिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त  ओमप्रकाश बकोरीया यांची उपस्थिती होती.

.केदार म्हणाले, या समितीच्या अंतर्गत राज्यातील सर्व मैदानांसाठी सेवा-शर्ती तसेच नियमावली तयार करण्यात येणार आहे. राज्यातील मैदानांचे व्यापारीकरण  होऊ न देण्याकरिता व सुरक्षित राहण्यासाठी समिती काम करेल. या समितीमध्ये क्रीडा आयुक्त आणि क्रीडा विभागाशी संबंधित इतर अधिकाऱ्यांचा समावेश असावा व शासन मुख्य अध्यक्ष स्थानी राहील असेही ते म्हणाले.

नवयुवकांसाठी मैदान उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मैदानावरील अतिक्रमण, झोपडपट्टी वाढणार याची काळजी घ्यावी.
धारावीच्या संकुलबाबत करार मागच्या वर्षी झाला आहे. करारातील सर्व सेवा -शर्ती सुधारित करण्यात यावेत. सदर मैदान गोर गरीब कुटुंबातील खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करण्यात यावे.  सदर खेळाडूंकडून कमीत कमी फी घेण्यासंदर्भात तरतूद करावी. मैदानांचे सर्व अधिकार शासनाकडे राखून ठेवण्यात यावेत असे केदार यांनी सांगितले.

केदार यांनी राज्यातील मैदाने जिल्हाधिकारी यांच्याकडे असतील,किंवा शासनाच्या इतर विभागाचे काही समस्या असतील तर तत्काळ सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश दिले. राज्यमंत्री कु.आदिती तटकरे आणि प्राजक्त तनपुरे यांनी विविध मैदानासंबंधी सूचना मांडल्या यावेळी शिंपोली, कांदिवली, धारावी, अंधेरी, मुलुंड, बोरीवली, मरोळ, ठाणे आणि ओव्हल मैदान यासह राज्यातील विविध मैदांनाविषयी चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: