अखेर अजोय मेहता यांना हटवले ;संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती

मुंबई, दि. 24 : संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्षात सुरू झालेल्या कुरकुरीला मेहता यांच्या काही निर्णयांची किनार होती यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी आज अखेर अजोय मेहता यांना हटवले ;संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती करून महाविकास आघाडीला तडे जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. असं असलं तरी ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.