fbpx

कोरोना – ३२१४ नवीन रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२३: कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६९ हजार  ६३१ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार  १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१,  यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.

 (टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या २४८ मृत्यूंपैकी ७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत आणि १७३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५,सोलापूर ४२, औरंगाबाद – १५, ठाणे -१३,  नाशिक -१८, जळगाव -७, अमरावती -१, बुलढाणा -१, कल्याण डोंबिवली -२, मालेगाव -१, मीरा भाईंदर -३, पिंपरी चिंचवड -१, रत्नागिरी -२, सांगली -१, सातारा -१, यांचा समावेश आहे.  हे  १७३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: