fbpx
Saturday, December 2, 2023
MAHARASHTRA

राज्यात सोमवारी 3721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 1962 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई, दि. 22 – राज्यात सोमवारी 3721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 49.86 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1962 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 61 हजार 793 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 62 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 6283 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 46, वसई विरार 2, रायगड 2 आणि कल्याण डोंबीवलीमध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 7 लाख 87 हजार 419 नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 35 हजार 796 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 1 हजार 182 जण होम क्वॉरंटाईनमध्ये तर 26 हजार 910 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 62 करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-20, कल्याण डोंबिवली मनपा-1, उल्हासनगर मनपा-1, मीरा-भाईंदर मनपा-13, पालघर-1, मालेगाव मनपा-8, पुणे-1, पुणे मनपा-9, पिंपरी-चिंचवड मनपा-1, औरंगाबाद-1, औरंगाबाद मनपा-3, लातूर-1, अकोला मनपा-2.

Leave a Reply

%d bloggers like this: