राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
पुणे, दि. २२ – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कॅटॅलिस्ट फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना मुळे मागील ३ महिन्यांपासून लोक घरात असल्यामुळे सर्व काही ऑनलाईन होतांना दिसत आहे. राजकीय सभा, मुलाखती, मार्गदर्शन, शाळांचे लेक्चर ऑनलाईन झालेले आपण पाहिले.याच पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा देखील ऑनलाईन पद्धतीने घेऊन कॅटॅलिस्ट फाऊंडेशन अनोखा उपक्रम राबवित आहे.
राज्यातील सर्वच नागरिक ह्या स्पर्धेत सहभागी घेऊ शकतात, या स्पर्धेत सहभागासाठी वय, भाषा असे बंधन नाही. याशिवाय ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे.
राजर्षी शाहू महाराज – उत्तम प्रशासक, राजर्षी शाहू महाराज – रयतेचा राजा, राजर्षी शाहू महाराज – आरक्षणाचे जनक, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक यंत्र, तंत्र आणि विचारांचे पुरस्कर्ते शाहू महाराज, कला, क्रीडा आणि संगीत जोपासणारा राजा – राजर्षी शाहू महाराज व माणगाव परिषद – राजर्षी शाहू महाराज असे एकूण ७ विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले असून सरासरी ५ मिनिटांमध्ये आपले मनोगत सादर करून दिनांक २६ जून २०२० पर्यंत व्हाट्सएप द्वारे कॅटॅलिस्ट फाऊंडेशन कडे पाठवावा असा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम विजेत्यास ₹५५५५/-, द्वितीय विजेत्यास ₹३३३३/-, तृतीय विजेत्यास ₹२२२२/- तर ३ उत्तेजनार्थ वक्त्यांना प्रत्येकी ₹११११/- असे पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी वक्त्यास डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कॅटॅलिस्ट फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील माने ह्यांनी यंदा माणगाव परिषदेची शताब्दी असल्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे मागील वर्षी घोषित केले होते. मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती पाहता ही स्पर्धा ऑनलाईन करावी लागत आहे. या स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त वक्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुनील माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.