fbpx

दिव्यांग प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग कुटुंबांना धान्यवाटप 

पिंपरी, दि. 22 – दिव्यांग प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांगाकडून दिव्यांगांना धान्यरुपी मदत करण्यात आली.

दिव्यांगांसाठी ‘एक ग्लास धान्य’ उपक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत जमा झालेले धान्य दिव्यांगांना वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे ओमप्रकाश पेठे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल निकम, संतोष छाजेड, दिव्यांग प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश सरडे आदी उपस्थित होते.

ओमप्रकाश पेठे यांनी सांगितले, की दिव्यांग प्रतिष्ठानने दाखवून दिले आहे, की आम्ही दिव्यांग असूनही आम्हीही समाजाला सहकार्य करू शकतो. अशा प्रकारचे स्तुत्य काम प्रतिष्ठानने केले, ही कौतुकास्पद बाब आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: