fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

सुशांत सिंह आत्महत्या- अखेर सलमान खानची प्रतिक्रिया आली

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खानला लक्ष्य करणारे नेटकरी आणि सलमानच्या फॅन्समध्ये काही ठिकाणी तूतूमैमै झालेली दिसली. सलमानच्या चाहत्यांनी #westandbysalmankhan हे हॅशटॅगवापरून ट्विट केले. आणि आपलं समर्थन दर्शवलं. ३ लाखाहून अधिक ट्विट सलमान खानच्या समर्थनार्थ केले आहेत. या सर्व प्रकरणावर अखेर सलमान खान सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे, त्याने म्हटले आहे की, मी माझ्या सर्व फॅन्सना विनंती करतो की सुशांतच्या फॅन्ससोबत उभे राहा. त्यांच्या भावना समजून घ्या. वाईट भाषा वापरु नका. या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबाला सहारा द्या. आपला कोणी निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानचे पोस्टर्स जाळण्यात आले. बिहारमध्ये सलमानच्या बिईंग ह्यूमन या आऊटलेटवर सुशांतच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. जागोजागी लागलेले सलमानचे पोस्टर्सदेखील फाडून टाकण्यात आले.

दबंगचा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने सलमान आणि त्याच्या परिवारावर आरोप केलेयत. दरम्यान गायक सोनू निगम याने देखील सलमानवर हल्ला चढवला. दोन व्यक्तींचा संगीतक्षेत्रातही दबदबा असून कोणी काय गायचं हे ठरवलं जातं. यामुळे संगीत क्षेत्रावर परिणाम होईल. या क्षेत्रातही आत्महत्या होऊ शकते असेही सोनू निगमने स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: