fbpx

कोरोना – राज्यात 3870 पुण्यात 620 नविन रुग्ण; तर 170 मृत्यू

६५ हजार ७४४ रुग्ण बरे झाले, ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री

मुंबई, दि.२१ : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६५ हजार ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

पुणे
– दिवसभरात सर्वाधिक ६२० पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १७१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात सहा करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– २९० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ६० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १२४७४.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-११७४७ आणि ससून ७२७)
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५२९.
– एकूण मृत्यू -५१०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ७४३५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३०८.

Leave a Reply

%d bloggers like this: