देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजारांपेक्षा जास्त वाढ
नवी दिल्ली, दि. 20 – देशात पहिल्यांदाच 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.