fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलची भविष्यात मागणी वाढेल :डॉ माणिकराव साळुंखे

पुणे, दि. १८ – नॅनो टेक्नॉलॉजीला पर्यावरण, संरक्षण, जीव रक्षण, वाहन निर्मिती, अंतराळ शास्त्र, खेळ अशा अनेक क्षेत्रात मागणी असल्याने अंगभूत वैविध्याने अत्यंत उपयुक्त अशा पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलला भविष्यात मागणी वाढेल,आणि व्यवसाय संधी निर्माण होतील,असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी केले.

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्रॅमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.१५ जून ते २१ जून दरम्यान हा फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्रॅम चालणार आहे. त्यात देश विदेशातील तज्ज्ञांनी ,प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे.
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले,’पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलच्या उपयुक्ततेमुळे त्याची बाजारपेठ भविष्यात १० टक्क्यांनी वाढणार आहे. कोरोना साथीच्या वर चालू असलेल्या संशोधनात देखील नॅनो टेक्नॉलॉजी आणि नॅनो सायन्सेस चा उपयोग आहे. याविषयी भारती विद्यापीठात देखील संशोधन चालू असून अशा संशोधनामुळे भावी काळात जीवने बदलून जातील.
डॉ.आनंद भालेराव म्हणाले,’पर्यावरण विषयक अनेक समस्या सोडविण्याच्या संदर्भात नॅनो कॉम्पोझिट विषयक संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.अनेक उद्योग या संशोधनाकडे आकर्षित होत आहेत. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनासाठी नॉर्थ कॅरोलिना ए टी अँड टी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ यांच्यात एकत्रित काम चालू आहे. भारती विज्ञापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनाला पेटंट मिळाली आहेत. या आंतरराष्ट्रीय फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्रॅम मध्ये देश विदेशातील ८५० प्राध्यापक ,संशोधकांनी सहभाग घेतला आहे. डॉ के बी सुतार ,डॉ सचिन चव्हाण,डॉडी डी मोहिते यांनी संयोजनात सहकार्य केले.

Leave a Reply

%d bloggers like this: