सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई करा
पुणे, दि. १६ – सोशल मीडियावरील आक्षेपार्ह लिखाण करणारे जाती धर्माच्या नावाने आसणारे ग्रुप बंद करून समाजात तेढ निर्माण करु पाहणार्यांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
विवेक बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, महोदय आपणास संघटनेच्या वतीने निदर्शनास आणत आहोत की पुरोगामी महाराष्ट्रात विराज जगताप , या तरूणांची जातीय मानसिकतेतून हत्या करण्यात आली त्यांनतर सोशल मीडियावर जाती धर्माच्या नावाने आसणारे ग्रुपमधून एकमेकावर खालच्या थरावर जाऊन महापुरुषांवर अवमानकारक लिखाण करणे, जातीना शिवीगाळ करणे,आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसिद्ध करणे, प्रसिद्धीच्या झोतात फेसबुक,टिकटाँक वर आपण काय बोलतो काय लिखाण करतो याचे भान विसरून दुसऱ्या जातीना डिवचण्याचे काम चालू आहे आपणच श्रेष्ठ आपलीच जात महान या जातीच्या अभिमानामुळे महाराष्ट्र राज्यात दंगलीचे वातावरण निर्मित होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर घडामोडींना वेळीच आवर घालणे गरजेचे आसल्याने जाती धर्माच्या नावाने फेसबुकवर आसणारे ग्रुप बंद करण्यात यावे तसेच टीकटाँक वरील आक्षेपार्ह व्हिडिओ ही डिलिट करण्यात यावे सोशल मीडियावर जाती जाती तेढ निर्माण करू पाहणार्या पोस्ट करणार्यांवर कायदेशीररीत्या कारवाई करावी अशी आपणास रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने नम्र विनंती