fbpx

धक्कादायक – सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तीचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. १६ – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कलाक्षेत्रातून दु:ख व्यक्त होतंय. त्याच्या अंत्यसंस्कारास २४ तास उलटत नाहीत तोपर्यंत सुशांतच्या परिवारातून आणखी एक दु:खद बातमी समोर येतेयं. सुशांतची वहिनी सुधा देवीचा मृत्यू झालाय. बिहारच्या पूर्णिया येथे त्या राहत होत्या. आधीच त्यांची तब्येत ठिक नव्हती. त्यात सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर त्यांना अधिकच धक्का बसला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली.

सोमवारी रात्री उशीरा त्यांच्या मृत्यूबद्दल कळाले. पूर्णियाच्या मलडीहा गावात ही घटना घडली. सुशांतच्या परिवाराने याबद्दल या बातमीला दुजोर दिलाय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. सुशांतने आत्महत्याचं केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. सोमवारी सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत साडे चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतला शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीतील अनेत कलाकार-मात्र उपस्थित होते.

सुशांतच्या बहिणीने, गेल्या ५ महिन्यांपासून सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज सुरु असल्याचं सांगितलं. ५ दिवसांपूर्वी त्याचं बहिणीशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी सुशांतने त्याची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सुशांतची बहीण त्याच्या वाद्र्यांच्या घरी आली होती. ती २ दिवस त्याच्याकडे राहिलीही होती. सुशांतने डिप्रेशनची औषधं खाणं बंद केल्याची माहिती मिळत आहे. सुशांतच्या मित्रांनी आणि कुकने, सुशांतचं वागणं काहीसं असामान्य होतं आणि तो डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता मुंबई पोलीस सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्याशिवाय, सुशांतने शेवटचा कॉल त्याचा मित्र महेश शेट्टीला केला होता. रात्री ३ च्या सुमारास त्याने महेशला कॉल केला होता, मात्र महेशने कॉल उचलला नसल्याने सुशांतचं त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं. सुशांतच्या मॅनेजरला सुशांतच्या फोनच्या पासवर्ड माहित होता. मॅनेजरने पासवर्ड काढल्यानंतर, सुशांतने रात्री ३ वाजता महेशला शेवटचा कॉल केल्याचं समजलं. त्यामुळे पोलीस महेश शट्टीचीही चौकशी करु शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: