fbpx
Thursday, September 28, 2023
ENTERTAINMENT

“झॉलीवूड”चा फ्रान्समध्ये सन्मान

विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित झॉलीवूड हा चित्रपट तृषांत इंंगळे या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केला आहे. या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी “झॉलीवूड” या चित्रपटाची निर्मिती केली असून ड्युक्स फार्मिंग फिल्म्स आणि अमित मासूरकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. न्यूटन, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मासूरकर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.
चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केलं आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या इराद्याने तृषांतनं १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता “झॉलीवूड” या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
पुरस्काराविषयी तृषांतनं आनंद व्यक्त केला. ‘झॉलीवूड हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराचा आनंद विशेष आहे. झाडीपट्टी हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. या विषयाला चित्रपटातून न्याय देऊ शकलो याचं समाधान वाटतं. करोना संसर्ग निवळून परिस्थिती पूर्वपदावर आली की चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल,’ असं तृषांतनं सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: