fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

ज्ञानेश्र्वरी आणि तुकाराम गाथेस अभिवादन करुन पुणेकरांनी पाडला श्रद्धा आणि भावनेचा उत्कट पायंडा

पालखी सोहळ्याची पुणेकरांनी केली एेतीहासीक नोंद

पुणे, दि. १५ – जगदगुरु संत तुकारम महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या पालखीचे देहू आणि आळंदी येथून होणारे प्रस्थान आणि त्यानंतर त्या पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि मुक्काम हा आनंदी सोहळा दरवर्षी पुणेकर अनुभवत असतात. त्या भक्ती रसात न्हाऊन निघत असतात. परंतू यंदा हा सोहळा करोनाच्या चक्रव्युवाहात अडकल्याने सर्वच पुणेकरांना या आनंद सोहळ्याला मुकावे लागत आहे. यातही पुणेरी बाणा जपत संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व चाैकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्या जवळ तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्र्वरीचे पूजन करुन पालखी सोहळा आणि संतांच्या कार्याला प्रतिकात्मक अभिवादन करण्यात आले.

पुणेकर आणि पालखी सोहळा याचे अद्वैत असून पुणेकर भाविक दरवर्षी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. करोनाचा पुण्यातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यंदा पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा अाहे. त्याच पंरपरेला स्मरुन संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामांचे वंशज , संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. सदानंद मोरे आणि महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी संत तुकाराम गाथा आणि संत ज्ञानेश्र्वर यांची ज्ञानेश्र्वरी डोक्यावर ठेऊन प्रातिनिधीक प्रदक्षिणा मारत दोन्ही ग्रंथांचे पूजन केले.

समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणे संस्थचे सुनील महाजन, पुणे महानागरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, महापाैर मुरलीधर मोहोळ, सचिन ईटकर, किरण साळी, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे, मंदार चिकणे, प्रशांत पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम फिजीकल डिस्कटन्सिंग आणि शासनातर्फे लागू असलेल्या नियमांच्या चाैकटीत राहूनच संपन्न झाला.

महापाैर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या काळात पुण्यात भक्तीचा महापुर आलेला असतो. पंरतू यंदाची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या प्रादूर्भावाच्या काळात वारक-यांनी देखील पुढाकार घेत जो समजंसपणा आणि समन्वय दाखविला तो काैतुकास्पद आहे. करोनाच्या प्रादूर्भावामुळे या पालखी सोहळ्याला यंदा अल्पविराम मिळाला असला तरी पुढीलवर्षी त्याच जोमाने आणि उत्साहाने पुणेकर पालख्यांचे स्वागत करण्यास सज्ज राहतील, यात शंका नाही.

पुणे महानागरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, करोनाच्या प्रादूर्भावाच्या काळात पुणेकरांनी नक्की काय भूमिका घेतली होती याचा धांडोळा इतिहासात घेतला जाईल त्यावेळी या एकमेव घटनेची नोंद पुणेकरांना सापडेल. तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्र्वरी ग्रंथांचे प्रातिनिधीक पूजन या घटनेची इतिहासात नोंद होईल. प्रशासकीय पातळीवर विविध संकटांना सामोरे जात असतांना पालखी सोहळ्यांसारखे प्रसंग आम्हा अधिका-यांना देखील प्रेरणा देत असतात.

समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले की,फिजीकल डिस्कटन्सिंग आणि शासनातर्फे लागू असलेल्या नियमांच्या चाैकटीत राहून मनातील भाव जपत हा कार्यक्रम संपन्न झाला. पुणेकर म्हणून पंरपरेत खंड पडु दिला नाही, याचा सार्थ अभिमान वाटतो. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले आणि सचिन ईटकर यांनी आैपचारिक आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: