fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

हातावर पोट असणाऱ्यांना राम फाउंडेशनचा मदतीचा हात

पुणे, दि. १४ – कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर राम फाऊंडेशनच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब, मजूर, वंचित, महिलांना, १५०० फूड पॅकेट, २ हजार रेशन कीटची मदत देण्यात आली. १२o० पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या आणि चहा पुरविण्यात आला.मार्केट यार्ड व लगतच्या परिसरात कोरोना साथी विषयक जनजागृती करण्यात आली. महिलांना वैद्यकीय साहित्य देण्यात आले. राम फाऊंडेशनचे अध्यक्ष कुणाल विकास नवगिरे यांनी यावर्षीचा रामनवमी सोहळा रद्द करुन ती रक्कम, मित्रांनी गोळा केलेला निधी एकत्र करुन या उपक्रमांवर खर्च केला.

या उपक्रमात अनिरुद्ध बनसोड, सूरज लाहोटी,विश्वनाथ वासावे, निखिल नवगिरे, ओमकार माने, आकाश नवगिरे, ओमकार विश्व, प्रतीक पाटोळे, चैतन्य दळवी, अथर्व हांडे, दीपक मालुसरे, अखिलेश बोत्रे, किरण डोळे, सूरज मलठणकर, बालाजी जगदाळे, सुमीत पवार, यश म्हेत्रे सहभागी झाले. १४ मार्च २०२० पासून हे उपक्रम मार्केट यार्ड, बिबवेवाडी,पज्ञावती, कात्रज, शनीवार पेठ, खराडी येथे सलगपणे चालू आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: